Aditi Tatkare On Ladki Bahin: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फेब्रुवारी व मार्च महिन्यातील दोन हप्ते ८ मार्चला महिलादिनी लाडक्या बहिणींना देणार असल्याची महिला व बाल कल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळाला नव्हता. त्यामुळे अनेक तर्क वितरक लावले जात होते. आता मात्र सदर दोन हप्ते हे 8 मार्चच्या महिला दिनाच्या पूर्वसंधेला मिळणार आहेत.
लाडक्या बहिणीला महिला दिनानिमित्त सरकारकडून गिफ्ट या निमित्त मिळणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून अनेक लाभार्थी महिलांना वागळण्यात असल्यामुळे आता लाभार्थी महिलांनाचा आकडा कमी झाला असल्याची माहिती. आज पासून मुबंई येथे अधिवेशन सुरु झाले असून याबाबत विरोधकडून याबाबत सरकारला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे महिला व बाल कल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी आधीच हप्ते बाबत घोषणा केल्याचे बोले जात आहे. दोन्ही हप्ते एकाच वेळी मिळाल्यास महिला वर्गाला नक्की महिला दिनाचे गिफ्ट मिळणार आहे.
Post a Comment