महावितरण भरतीच्या विविध नवीन जाहिराती जाहीर!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (Mahadiscom Recruitment 2025) अंतर्गत नाशिक आणि अमरावती जिल्ह्यात 2025 साठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरती अंतर्गत अभियांत्रिकी पदवीधर शिकाऊ, अभियांत्रिकी डिप्लोमा शिकाऊ आणि कला-वाणिज्य पदवीधर शिकाऊ अशा एकूण 70 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 5 मार्च 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करावा.

पदाचे नाव : अभियांत्रिकी पदवीधर शिकाऊ आणि कला-वाणिज्य पदवीधर शिकाऊ 

पगार : ₹9,000/- प्रतिमाह, तर अभियांत्रिकी डिप्लोमा शिकाऊ उमेदवारांना 8,000/- प्रतिमाह स्टायपेंड दिला जाईल. 

अधिकृत वेबसाईट -  www.mahadiscom.in 

या महावितरणच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा.

भरती नोटिफिकेशन शोधा: “करिअर” किंवा “नोकरी” विभागात जाऊन संबंधित भरतीची नोटिफिकेशन पाहावी.


ऑनलाईन अर्ज - “Apply Online” वर क्लिक करा: नोटिफिकेशन वाचल्यानंतर, “ऑनलाइन अर्ज करा” किंवा “Apply Online” लिंकवर क्लिक करून अर्ज प्रक्रिया सुरू करा.

रजिस्ट्रेशन करा / लॉगिन करा: जर उमेदवार नवीन असेल, तर त्याने प्रथम रजिस्ट्रेशन करावे. आधीपासून खाते असल्यास, User ID आणि पासवर्डने लॉगिन करावे.

शैक्षणिक माहिती : उमेदवारांनी आपली शैक्षणिक माहिती, वैयक्तिक माहिती आणि संपर्क तपशील भरावा.

कागदपत्रे अपलोड करा: आवश्यक असलेली कागदपत्रे (शैक्षणिक प्रमाणपत्र, ओळखपत्र, छायाचित्र, स्वाक्षरी इत्यादी) अपलोड करावी.

 ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख -  5 मार्च 2025 आहे. इच्छुक उमेदवारांनी वेळेवर अर्ज सादर करून ही सुवर्णसंधी साधावी. अधिक माहितीसाठी Mahavitaran Recruitment 2025 PDF डाउनलोड करून तपशील वाचावा.


0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post