शिक्षकेतर कर्मचारी कनिष्ठ लिपिक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहायक भरतीचा मोठा निर्णय, या पद्धतीने होणार पद भरती.


राज्यातील हजारो उमेदवारांची वर्षानुवर्षांची प्रतीक्षा अखेर संपली आहे! शिक्षकेतर पदभरतीचा मार्ग मोकळा करत राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय म्हणजेच शिक्षकेतरांच्या आयुष्यातील एक नवा वळणबिंदू ठरणार आहे! कनिष्ठ लिपिक , पूर्णवेळ ग्रंथपाल ,प्रयोगशाळा सहायक या पदांची १००% नामनिर्देशनाने भरती करण्यात येणार असून, अनुकंपा नियुक्तीलाही समावेश आहे – जे खरोखरच अनेक कुटुंबांसाठी दिलासादायक आहे. ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी २०२२’ च्या धर्तीवर शिक्षकेतर पदांचीही भरती केली जाणार आहे. 

भरती प्रक्रिया कशी होणार?

  • - मान्यताप्राप्त खासगी अंशतः/पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये भरती 
  • - विद्यार्थ्यांच्या संख्येच्या आधारे मंजूर पदसंख्या 
  • - चतुर्थश्रेणी कर्मचारी पद रद्द, त्याऐवजी शिपाई भत्ता लागू 
  • - नियमित असलेले चतुर्थश्रेणी कर्मचारी सेवानिवृत्तीपर्यंत कायम 

शालेय शिक्षण विभागाने अधिकृत अध्यादेश काढून ही प्रक्रिया सुरू केली असून, हीच बाब शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा दिलासा ठरणार आहे. 

शिक्षकांवरील ताण कमी होणार

आजपर्यंत शिक्षकांना प्रशासकीय कामकाज , प्रयोगशाळा व्यवस्थापन , आणि ग्रंथालयाचे व्यवहार  पाहावे लागत होते. पण आता या सर्व जबाबदाऱ्या तज्ज्ञ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडे सोपवल्या जातील, त्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेतही लक्षणीय वाढ होणार आहे. 

‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी २०२२’ च्या धर्तीवर शिक्षकेतर पदांचीही भरती केली जाणार आहे. ८०% रिक्त पदांची सरळसेवेने भरती होणार असून, ही भरती पारदर्शकतेने होणार याची हमी सरकारने दिली आहे. 

शिवाजी खांडेकर,सरकार्यवाह, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर महामंडळ यांनी सांगितले की, "२१ वर्षांची प्रतीक्षा संपली आहे! आता विभागीय आयुक्तांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की अनुशेष तपासून भरती प्रक्रिया सुरू करा. जवळपास ५,००० उमेदवारांना याचा थेट लाभ मिळणार आहे!"

या निर्णयामुळे हजारो तरुणांना नोकरीची संधी मिळणार असून, शिक्षकांवरील अतिरिक्त कामाचा भार आता कमी होणार आहे. दरम्यान शैक्षणिक व्यवस्थेत सकारात्मक बदलाचे कर्मचारी संघटनांकडून स्वागत करण्यात आले आहे. 

0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post