शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा २०२५ जाहीर असून, या संदर्भातील परिपत्रक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्रसिद्ध करण्यात आले आहे. सदर प्रसिद्धी पत्रकानुसार, महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करीता शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) २०२५ या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन माहे मे व जून २०२५ मध्ये करण्याचे नियोजित आहे.
पात्र उमेदवारांनी सदर परीक्षेबाबत आवश्यक ती पूर्वतयारी करावी असे आवाहन करण्यात येत आहे. परीक्षेबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिध्द करण्यात येईल. तेव्हा इच्छुक उमेदवारांनी वेळोवेळी सदर संकेतस्थळावर भेट द्यावी.
TAIT EXAM प्रसिद्धीपत्रक pdf डाउनलोड करा
WhatsApp Group
Join Now
Telegram Group
Join Now
परीक्षेचे आयोजन:
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद (MSCEPune) लवकरच TAIT-२०२५ परीक्षेचे नियोजन करेल.
पात्रता:
शिक्षक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची पात्रता आणि योग्यता तपासण्यासाठी ही परीक्षा घेतली जाते.
महत्व:
या परीक्षेमार्फत, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षमतांचे मूल्यांकन केले जाते.
अधिक माहितीसाठी:
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळाला (www.mscepune.in) भेट द्या.
Post a Comment