IPL 2025 Match Timing: इंडियन प्रीमियर लीग 2025 ला आजपासून सुरू होणार आहे. IPL चा पहिल्या सामना कोलकाता नाईट रायडर्स Vs रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू असा होणार आहे. एकूण 10 संघांमध्ये स्पर्धा रंगणारअसून, पहिल्या सामन्यापूर्वी उद्घाटना कार्यक्रम होणार आहे. पहिल्या दिवशी फक्त एकच सामना आहे, परंतु दुसऱ्या दिवशी दोन सामने खेळवले जातील.
दरम्यान 65 दिवसात 74 सामने रंगणार असून, आयपीएल 2025 ही या स्पर्धेचा 18 वा हंगाम असणार आहे. यावेळीही ही स्पर्धा 10 संघात खेळवली जाणार आहे. ही स्पर्धा 65 दिवस चालणार असून यात एकूण 74 सामने खेळले जाणार आहेत. कोलकातामधील ईडन गार्डन्स स्टेडियमवर गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात पहिला सामना रंगणार आहे, तर 25मे रोजी ईडन गार्डन्स स्टेडियमवरच अंतिम सामना होणार आहे.
सामने किती वाजता सुरु होणार?
आयपीएलचा पहिला सामना 22 मार्च रोजी खेळला जाणार आहे. हा सामना संध्याकाळी ठीक 7.30 वाजता सुरू होणार आहे. या सामन्याचा टॉस अर्धा तास आधी म्हणजे 7 वाजता होईल. या स्पर्धेत संध्याकाळी होणाऱ्या सर्व सामन्यांची वेळ सारखीच राहील. तसेच डबल हेडर दिवशी पहिल्या सामन्याचा टॉस दुपारी 3 वाजता होईल आणि सामना ठीक 3.30 वाजता सुरू होईल. म्हणजेच रविवारी दुसरा सामना सुरू होईपर्यंत पहिला सामना संपेल याची खात्री केजी जाईल. त्यानंतर दुसरा सामना 7.30 वाजता सुरु होईल.
आयपीएल स्पर्धा कुठे पाहता येणार?
आयपीएल 2025 चे सर्व सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर टीव्हीवर प्रसारित केले जाणार आहेत. तसेच आयपीएल 2025 च्या सर्व सामन्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओहॉटस्टार अॅप आणि त्यांच्या वेबसाइटवर केले जाणार आहे. मोबाईल युजर्स या प्लॅटफॉर्मवर स्पर्धेतील सामने पाहू शकणार आहेत. मात्र यासाठी तुम्हाला सबस्क्रिप्शन घ्यावे लागणार आहे.
Post a Comment