Maha Police Recruitment 2021: राज्याच्या डिसेंबर महिन्या नंतर पोलिस दलातील रिक्त पदासाठी भरती करण्यासाठीच्या हालचाली सुरु झाल्या असून तब्बल 13 हजार पदासाठी भरती होणार असल्याची माहिती सूत्रां मार्फत मिळाली आहे. दरम्यान पोलीस भरती प्रक्रियेत मोठा बदल करण्यात आला आहे. सध्या सुरू असलेली भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर यापुढे होणाऱ्या प्रत्येक पोलिस भरतीची प्रक्रिया शारीरिक चाचणीपासून सुरू होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील तरुणांना मोठा फायदा होईल.
पोलीस भरती प्रक्रियेतील नवीन बदल.
पूर्वी पोलिस भरतीसाठी उमेदवारांना पहिल्यांदा लेखी परीक्षा द्यावी लागत होती. त्यामध्ये उत्तीर्ण झालेल्यांचीच मैदानी चाचणी घेतली जात होती.आता सर्वप्रथम शारीरिक चाचणी होणार असून त्यात उत्तीर्ण उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बसता येणार आहे.
ग्रामीण भागातील उमेदवारांना विशेष फायदा!
पूर्वी पोलिस भरतीसाठी पहिल्यांदा लेखी परीक्षा द्यावी लागत, नंतर त्यामध्ये उत्तीर्ण झालेल्यांचीच मैदानी चाचणी घेतली जात असे. त्यामुळे मैदानी चाचणीत हुशार असलेले विशेषत: ग्रामीण भागातील अनेक उमेदवार भरती प्रक्रियेतून बाहेर जायचे आणि पुस्तकी ज्ञानात पुढे असलेले उमेदवार पुढे जायचे. यामध्ये, लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्यां अनेक उमेदवारांची छाती, उंची अशी शारीरिक चाचणी मानके कामी असलेले उमेदवार असायचे.त्यामुळे या नवा बदलामुळे लेखीत हुशार व मैदानी चाचणीचे निकष पूर्ण करणारे उमेदवार आता पोलीस भरती होण्यास वाव आहे.
Post a Comment