Arogy Vibhag bharti 2021 : आरोग्य विभाग भारती 2021 परीक्षा घेताना सध्या होत असलेला सावळा गोंधळ पाहता, 31 ऑक्टोबर रोजी होणारा पेपर पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे. परीक्षा नियोजनात होणाऱ्या गोंधळामुळे राज्य शासनाच्या कार्यप्रणालीवर आता प्रश्न विचारले जात असल्यामुळे पुढील पेपर पूर्वी व्यवस्थित नियोजन होणे अपेक्षित आहे. त्यामुळे आरोग्य विभागाकडून तसेच प्रयत्न राहणार आहेत.
दरम्यान शाळांना दिवाळी सुट्ट्या लागणार असल्यामुळे शाळा बंद राहू शकतात. त्यामुळे सदर पुढील पेपर नियोजन करण्यासाठी वेळ लागू शकतो, त्यामुळे म्हणून, 31 ऑक्टोबरला नियोजित पेपर पुढे ढकलला जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
परीक्षा आयोजनातील त्रुटी!
Department of Public Health Exam सेंटरवर पेपर एका विषयाचा अन् प्रश्नपत्रिका दुसरीच , केंद्रांवर पर्यवेक्षक गैरसहजर , प्रश्नपत्रिका मिळण्यासाठी विलंब , या गोंधळामुळे उमेदवारांचा राज्य सरकारबाबत नाराजी वाढत आहे. त्यामुळे पुढील परीक्षेपूर्वी आरोग्य विभागाला ठोस नियोजन करावे लागणार आहे . त्यासंदर्भातील हालचाली वरिष्ठ पातळीवरून सुरु झाल्याचे , अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली .
Post a Comment