News Jobs

YCM Open University Exam 2021 : यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठाच्‍या हिवाळी सत्र परीक्षा सूचनापत्र जारी! परीक्षा ऑनलाईन कि ऑफलाईन होणार जाणून घ्या.

YCM Open University Exam 2021

YCM Open University Exam 2021
:  यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठाच्‍या (Yashwantrao Chavan Maharashtra Open University) हिवाळी सत्र परीक्षा या डिसेंबर महिन्या पासून घेतल्‍या जाणार आहेत. या संदर्भातील सूचनापत्र विद्यापीठा कडून जाहीर करण्यात आले आहे. यानुसार  २०२१-२२ या शैक्षणिक वर्ष करीता होणाऱ्या या परीक्षा फेब्रुवारी महिन्या पर्यंत टप्‍याटप्‍याने घेण्याचे नियोजन आहे . तसेच विद्यापीठाच्‍या अधिकार मंडळाने घेतलेल्‍या निर्णयानुसार सर्व शिक्षणक्रमांच्‍या सर्व सत्रांच्‍या परीक्षा एकाच वेळी घेतल्‍या जाणार असल्याचे सूचनापत्रात नमूद करण्यात आले आहे.

मुक्‍त  विद्यापीठाच्‍या हिवाळी सत्र लेखी आणि पुनर्परीक्षा कार्यक्रम स्वरूप 

  • मुक्‍त  विद्यापीठाच्‍या हिवाळी सत्र लेखी आणि पुनर्परीक्षा डिसेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ दरम्‍यान घेतल्‍या जाणार आहेत.
  • सर्व शिक्षणक्रमांच्‍या शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये प्रवेशित नियमित विद्यार्थ्यांच्‍या प्रथम, तृतीय, पाचवे आणि सातव्‍या सत्राची लेखी परीक्षा होईल.
  • सर्व शिक्षणक्रमांच्‍या पुर्नपरीक्षार्थी (रिपिटर) विद्यार्थ्यांची सर्व सत्रांच्‍या लेखी परीक्षा (पुनर्परीक्षा) या कालावधीत घेतल्‍या जाणार आहेत.
  • पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांची सर्व शिक्षणक्रमाच्‍या वार्षिक परीक्षेच्‍या लेखी पुनर्परीक्षा होईल. अशा विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा अर्ज भरण्याची मुदत २० नोव्‍हेंबरपर्यंत असणार आहे.
  • यानंतर ३० नोव्हेंबरपर्यंत प्रती परीक्षा शंभर रुपये इतक्‍या विलंब शुल्‍कासह परीक्षा अर्ज भरता येईल.
  • विविध पदवी, पदव्‍युत्तर पदवी अभ्यासक्रमाचा नोंदणी कालावधी संपलेल्‍या विद्यार्थ्यांना पुर्ननोंदणी अर्ज परीक्षा अर्जातच संबंधित पोर्टलवर करायचा आहे.

परीक्षा ऑनलाईन कि ऑफलाईन होणार?

मुक्त विदयापीठाच्या परीक्षा या ऑनलाईन कि ऑफलाईन होणार या बाबत परीक्षेच्‍या स्‍वरुपाची घोषणा नाही विद्यापीठा कडून आणखीन करण्यात आली नाही. ऑनलाइन अथवा ऑफलाईन पद्धतीने विद्यापीठ निर्णयानुसार ही परीक्षा घेतली जाणार असल्‍याचे स्‍पष्ट केले आहे. तसेच परीक्षा आयोजनाबाबत आणि परीक्षेचे स्‍वरुप, कार्यपद्धती याबाबत सविस्‍तर कळविले जाणार आहे. तसेच परीक्षेचे वेळापत्रकही अथावकाश जारी केले जाणार असल्याचे  सूचनापत्रात नमूद करण्यात आले आहे.

सूचनापत्र डाउनलोड करा : येथे क्लिक करा 

Post a Comment

Previous Post Next Post