News Jobs

TAT Exam Update : शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ( TAT ) परीक्षा फेब्रुवारी 2022 मध्ये होणार! शासनाकडून परिपत्रक जारी.

अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022

TAT Exam Update
: The state government had issued a circular on June 23, 2017 and decided to conduct 'Aptitude and Intelligence Test (TAT)' every four months. While implementing this decision, he also took the first 'TAIT' exam in December 2017; However, since then, the test has not been conducted every four months. Now, as per the provisions, Additional Secretary to the Government of Maharashtra, Praveen Mundhe has issued an order to conduct Teacher Aptitude and Intelligence Test in February 2022, with proper coordination with the concerned authorities. The letter has been sent to the Maharashtra State Examination Council Commissioner.

राज्य सरकारने २३ जून २०१७ ला परिपत्रक काढून दर चार महिन्याला 'अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचे (TAT)'चे आयोजन करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाची अंमलबजावणी करताना त्यांनी पहिली 'टीएआयटी' परीक्षादेखील डिसेंबर २०१७ मध्ये घेतली; मात्र, त्यानंतर दर चार महिन्यांनी या परीक्षेचे आयोजन केले नाही. आता मात्र  तरतुदी नुसार संबंधित यंत्रणाशी सुयोग्य समन्व्य साधून फेब्रुवारी 2022 मध्ये शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचे आयोजन करण्यासाठी परिपत्रक काढत महाराष्ट्र शासनाचे अपर सचिव प्रवीण मुंढे यांनी आदेश जारी केला आहे. सदर पत्र हे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे आयुक्त यांना पाठवण्यात आले आहे.

'अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचे (TAT) तत्काळ आयोजन करू न शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा राबवावा,' अशी मागणी डी.एड/बी.एड धारक उमेदवार वारंवार करीत होते. अनेक शाळा मध्ये शिक्षकांची रिक्त पदे असतानासुद्धा शिक्षकांची तोकडी भरती शासनाने राबवली जात असल्याचे डी.एड/बी.एड धारक उमेदवारांची ओरड होती. आता मात्र 'अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचे (TAT) परीक्षा झाली तर नक्कीच मोठी शिक्षक भरती येत्या काळात होऊ शकते, अशी अशा उमेदवारांकडून व्यक्त होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post