Satara Police Patil bharti 2021 :सातारा जिह्यातील पोलीस पाटील या पदाच्या एकुण १६७१ पदे मंजूर असून त्यापैकी ६५२ पदे सद्यस्थितीत रिक्त आहेत . कोरोनाच्या पार्श्वभुमिवर जिल्ह्यात कार्यरत पोलीस पाटीलांच्यावरती अतिरिक्त ताण येत आहे व कोरोनाच्या पार्श्वभुमिवर पाटलांचे प्रत्येक गावामध्ये लसीकरण किंवा इतर कार्यक्रमामध्ये उणीव भासत आहे , या कारणाने सातारा जिल्ह्यातील सर्व उपविभागीय स्तरावर रिक्त पोलीस पाटील संवर्गातील एकुण ६५२ रिक्त पदे भरणेच्या अनुषंगाने संपूर्ण सातारा जिल्ह्यात एकाच वेळेस भरती प्रक्रिया राबविण्याबाबतचा कालबध्द कार्यक्रम खालीलप्रमाणे तयार करणेत आलेला आहे .
- हेही वाचा : SBI Bharti 2021 : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ७४२५ सुरक्षा रक्षकाची बंपर पदभरती !! असा करा अर्ज
वर नमुद केलेनुसार पोलीस पाटील भरती प्रक्रियेची कार्यवाही दिलेल्या तारखेनुसार पार पाडणेत यावी . वर नमुद केलेल्या दिनांकाच्या आधी आपले कार्यालयाकडून प्रक्रिया पुर्ण होणार असलेस त्यास वर नमुद दिनांकाची बाधा येणार नाही . तथापि , वर नमुद दिनांकास ( Cut off date ) कोणत्याही परिस्थितीत सदरची प्रक्रिया पूर्ण करणे आपणांवर बंधनकारक असेल , याची नोंद घ्यावी .
सदर पोलीस पाटील संवर्गातील भरतीप्रक्रिया पुर्ण करुन त्याबाबतचा अहवाल दिनांक १४/०१/२०२२ पर्यंत या कार्यालयास सादर करणेत यावा . सदर पोलीस पाटील संवर्गातील भरतीप्रक्रिया पुर्ण करुन त्याबाबतचा अहवाल दिनांक १४/०१/२०२२ पर्यंत प्राप्त न झालेस शासन नियमातील तरतुदीनुसार कार्यवाही करणेत येईल याची नोंद घ्यावी .
सातारा पोलीस पाटील परिपत्रक :👉 - Download
Post a Comment