News Jobs

टीईटी व नेट परीक्षा एकाच दिवशी! परीक्षार्थीमध्ये संभ्रवस्था. एसटी संपामुळे परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्याची मागणी.


MAHATET Update 2021
: राज्यात मागील दोन वर्षांपासून विविध कारणास्तव न झालेल्या टीईटी परीक्षा अखेर २१ नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहे .परीक्षार्थीना प्रवेशपत्र पण लॉगिनवर उपलब्ध करून देण्यात आली असून, इतर तयारीही पूर्ण करण्यात आलेली आहे . मात्र , नेमकी त्याच दिवशी सुनियोजित नेट ची परीक्षा होणार असल्यामुळे दोन्ही परीक्षा देणाऱ्या उमेदवारांमध्ये संभ्रवस्था निर्माण झाली आहे .

दरम्यान शासनाकडून दोन्ही परीक्षा होणार आहेत, असेच सांगितले जात असून, यावेळी चार वेळा MAHATET परीक्षा रद्द झाल्यामुळे,  विद्यार्थी शेवटच्या दिवसा पर्यंत टीईटी होणार का पुढे ढकली जाणार याबाबत काही सांगता येणार नसल्याचे म्हणत आहेत. परीक्षा विभागाने परीक्षा घेण्याची तयारी केल्याचे अंतर्गत सूत्राकडून समजते.

एसटी संपाचा परीक्षावर परिणाम होणार! परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्याची मागणी!

राज्यात सध्या एसटी  कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे या दोन्ही परीक्षेच्या उमेदवारांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यात अडचणी येणार आहेत.दरम्यान परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्याची मागणी काही उमेदवारांकडून करण्यात येत आहे . प्राथमिक शिक्षक होण्यासाठी घेण्यात येणारी टीईटी परीक्षा ही मागील दोन ते तीन वर्षांपासून न आल्यामुळे भावी शिक्षकांमध्ये नाराजीची भावना आहे . आतापर्यंत टीईटीच्या परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये चार वेळा बदल करण्यात आले आहे .


Post a Comment

Previous Post Next Post