News Jobs

प्राध्यापक भरती 2021 : राज्यात २ हजार ८८ प्राध्यापकांची भरती!

प्राध्यापक भरती 2021

प्राध्यापक भरती 2021
: Higher and Technical Education Minister Uday Samant on Tuesday announced the approval to fill 2,088 posts of professors and principals of various subjects in the state's universities and their affiliated colleges. This recognition has been given in a meeting chaired by Chief Minister Uddhav Thackeray and Deputy Chief Minister Ajit Pawar. Accordingly, 2,088 posts will be filled in the first phase, explained Higher and Technical Education Minister Uday Samant.

राज्यातील विद्यापीठे आणि त्यांच्याशी संलग्न महाविद्यालयातील विविध विषयांच्या प्राध्यापकांची २ हजार ८८ पदे आणि प्राचार्यांची पदे भरण्यास मान्यता मिळाल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी जाहीर केले . सदर मान्यता वरिष्ठ महाविद्यालयातील विविध विषयांची रिक्त पदे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार नेतृत्त्वाखालील बैठकीत देण्यात आली आहे . त्यानुसार पहिल्या टप्प्यातील २ हजार ८८ पदे भरली  जाणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले .

दरम्यान अकृषी विद्यापीठे आणि त्यांच्याशी संलग्न महाविद्यालयातील शिक्षकीय भरतीत प्राध्यापक संवर्ग आरक्षण कायदा २०१ ९च्या अंमलबजावणीबाबत संभ्रम आहे तसेच  विषयनिहाय आरक्षण धोरणानुसार भरती प्रक्रिया राबविल्यास मागास प्रवर्गातील उमेदवारांवर अन्याय होण्याची भीती काही घटकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सदर भरती वाद न्यायालयात जाणार असे दिसत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post