Maharashtra TET Admit Card 2021: The Admit Card for the Maharashtra Teacher Eligibility Test to be held in the state on November 21 will be issued on the official website from today, October 26. Admission tickets will be issued by Maharashtra State Examination Council, Pune. Candidates can download their tickets by visiting mahatet.in, login with the help of roll number and other details. TET paper | and paper || Two such papers will be taken. Admission letter will be received accordingly.
राज्यात 21 नोव्हेंबरला होणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता चाचणीसाठीचं प्रवेशपत्र ( अॅडमिट कार्ड ) अधिकृत वेबसाइटवर आज दिनांक 26 ऑक्टोबर पासून दिले जाणार आहे . महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद , पुणे द्वारे प्रवेशपत्र दिले जाणार असून परीक्षार्थी mahatet.in ला भेट देऊन , रोल नंबर आणि इतर तपशीलांच्या मदतीने लॉगिन करून परीक्षार्थी आपले प्रवेशपत्र डाउनलोड करु शकतात . TET पेपर |आणि पेपर || असे दोन पेपर घेतले जाणार आहेत . त्यानुसार प्रवेश पत्र मिळणार आहे.
असे डाउनलोड करा महाराष्ट्र टीईटी प्रवेशपत्र 2021
1.अधिकृत वेबसाइट mahatet.in ला भेट द्या .
2 : आता मेन पेजवर दिसणाऱ्या प्रवेशपत्राच्या लिंकवर क्लिक करा .
3 : लॉगिन पेजवर , आपला अर्ज क्रमांक आणि संकेत शब्दासह लॉगिन करा .
4 : प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल , ते डाउनलोड करा .
5 : तुमच्या प्रवेशपत्राची प्रिंट काढा .
महत्वाची सूचना : प्रवेशपत्र डाउनलोड केल्या नंतर प्रवेशपत्रात उमेदवाराने स्वतःचे नाव , जन्मतारीख , परीक्षा केंद्राचा तपशील , रोल नंबर आणि इतर तपशील इ बरोबर असल्याची खात्री करावयाची आहे. जर प्रवेशपत्रात काही विसंगती किंवा चुकीचं आढळल्यास , mahatet2021.msce@gmail.com वर तक्रार पाठवू पाठवावी असे आवाहन परीक्षा विभागाकडून करण्यात आले आहे.
Post a Comment