MAHATET Updates 2021 :The Maharashtra Teacher Eligibility Test, which will be held on October 30 in the state, has been postponed for the third time and a new date has been announced by the concerned department. According to the new schedule announced by the concerned department on the website, the Maharashtra Teacher Eligibility Test (TET) will be held on November 21. Candidates will be able to download tickets from October 26 to November 21.
राज्यात 30 ऑक्टोबरला होणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता चाचणी परीक्षा पुन्हा एकदा तिसऱ्या वेळस पुढे ढकलण्यात आली असून संबंधित विभागाकडून परीक्षाची नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे. संबंधित विभागाकडून नवीन वेळापत्रक वेबसाईटवर जाहीर करण्यात आले असून यानुसार आता 21 नोव्हेंबरला महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा ( TET ) होणार आहे. तर 26 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर पर्यंत परीक्षार्थीना प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहेत.
असे करा MAHATET प्रवेशपत्र डाउनलोड :
1.अधिकृत वेबसाइट mahatet.in ला भेट द्या .
2 : आता मेन पेजवर दिसणाऱ्या प्रवेशपत्राच्या लिंकवर क्लिक करा .
3 : लॉगिन पेजवर , आपला अर्ज क्रमांक आणि संकेत शब्दासह लॉगिन करा .
4 : प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल , ते डाउनलोड करा .
5 : तुमच्या प्रवेशपत्राची प्रिंट काढा .
वेळापत्रक डाउनलोड करा : येथे क्लिक करा.
प्रवेशपत्रात उमेदवाराचे नाव , जन्मतारीख , परीक्षा केंद्राचा तपशील , रोल नंबर आणि इतर तपशील , असतील . उमेदवारांना अॅडमिट कार्डमध्ये दिलेली सर्व माहिती तपासण्याचा सल्ला दिला गेलाय . प्रवेशपत्रात काही विसंगती किंवा चुकीचं आढळल्यास , तुम्ही mahatet2021.msce@gmail.com वर तक्रार पाठवू शकता .
Post a Comment