News Jobs

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ ऑनलाईन प्रवेश मुदतवाढ!

यशवंतराव मुक्त विद्यापीठ नाशिक

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे सन 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी विविध शिक्षणक्रमाचे ऑनलाईन प्रवेशासाठी दिनांक 01 जुलै 2021 ते 25 ऑक्टोबर 2021 पर्यंत विना विलंब शुल्क मुदत देण्यात आली होती . तथापी संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर कार्यरत असलेली अभ्यासकेंद्रे आणि विद्यार्थ्यांची मागणी व गरज लक्षात घेऊन ( बी . एड् . व कृषी शिक्षणक्रम वगळून ) विलंब शुल्कासह ( रु . 100 / - शंभर मात्र ) ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची मुदत दिनांक 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत वाढविण्यात येत आहे .

ऑनलाईन प्रवेश अर्ज विहीत मुदतीत सादर करून निवडलेल्या अभ्यासकेंद्रावर संपर्क साधून प्रवेशास मान्यता ( Study Center Approval ) दिनांक 05 नोव्हेंबर पर्यंत घ्यावी . दिनांक 06/11/2021 पासून अभ्यासकेंद्र मान्यतेची लिंक बंद करण्यात येईल व त्यानंतर अभ्यासकेंद्रांना प्रवेश पात्रता करता येणार नाही .

 परिपत्रक 


Post a Comment

Previous Post Next Post