News Jobs

CTET 2021-केंद्रीय शिक्षक पात्रता ( CTET ) परीक्षेच्या तारखा जाहीर! सविस्तर माहिती वाचा.

CTET 2021 तारखा  जाहीर

CTET Exam 2021
: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं शिक्षक पात्रता परीक्षेच्या ( CTET ) तारखा नुकत्याच जाहीर केल्या असून त्या संदर्भात प्रेस नोट अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.  CTET परीक्षेची 15 वी संगणक आधारित चाचणी 16 डिसेंबर 2021 ते 13 जानेवारी 2022 दरम्यान आयोजित केली जाणार असून ही परीक्षा देशभरातील 20 भाषांमध्ये घेतली जाईल . परीक्षा , अभ्यासक्रम , पात्रता निकष , परीक्षा शुल्क , परीक्षा शहर आणि महत्वाच्या तारखा ह्या केंद्राच्या अधिकृत वेबसाइटवर ctet.nic.in उपलब्ध करण्यात येणार आहेत . दरम्यान , इच्छुक उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवरून माहिती डाउनलोड करण्याची आणि अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचण्याची विनंती सीबीएसईकडून करण्यात आलीय . 

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 20 सप्टेंबर 2021 पासून सुरू होणार!

उमेदवारांना केवळ CTET वेबसाइटद्वारे ctet.nic.in ऑनलाइन अर्ज करता येणार आहे . ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 20 सप्टेंबर 2021 पासून सुरू होणार असून ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे , तर 20 ऑक्टोबर 2021 रोजी दुपारी 3:30 पर्यंत फी भरता येणार आहे .

Application Fees For CTET Registration

 • या परीक्षेकरिता सामान्य / ओबीसी उमेदवारांना एका पेपरसाठी 1000 रुपये , 

• तर दोन्ही पेपरसाठी 1200 रुपये अर्ज फी भरावी लागणार आहे .

 • तसेच एससी / एसटी / पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी एका पेपरला 500 व दोन्ही पेपरसाठी 600 रुपये अर्ज फी द्यावी लागणार आहे .

•  केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेच्या पॅटर्नमध्ये सुधारणा करण्याबाबत सीबीएसईने जुलै 2021 मध्ये अधिसूचना जारी केली होती . या अधिसूचनेनुसार , यात काही बदलही करण्यात आले आहेत .

सीटीईटी परीक्षा ऑनलाइन माध्यमातून घेतली जाणार.

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा ( CTET ) मध्ये महत्वाचे बदल होत आहेत . केंद्रीय , माध्यमिक शिक्षण बोर्ड ( CBSE ) ने अधिकृत नोटीस जाहीर करुन याबद्दल माहिती दिली . सीबीएसईने दिलेल्या माहितीनुसार सीटेट २०२१ चा परीक्षा पॅटर्न वेगळा असणार आहे . तसेच ही परीक्षा ऑफलाइन माध्यमातून होणार नसून ती ऑनलाईन घेतली जाणार आहे. ऑनलाइन परीक्षा ( CTET Online Exam ) सीटेट परीक्षा आयोजनात महत्वाचा बदल करण्यात आला आहे . डिसेंबर २०२१ / जानेवारी २०२२ मध्ये होणारी सीटीईटी परीक्षा ऑनलाइन माध्यमातून घेतली जाणार असल्याचे सीबीएसईकडून सांगण्यात आले आहे .

यातून येणारे शिक्षक हे कॉम्प्युटर आणि इंटरनेट फ्रेंडली देखील होतील . तसेच ओएमआर शीट्स आणि प्रिंटेड प्रश्न पत्रिकांमुळे मोठ्या प्रमाणात होणारा कागदाचा वापर टाळला जाऊ शकेल .  पुढच्या सीटेट परीक्षा २०२१ साठी अर्ज भरल्यानंतर वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे . ' वेळापत्रक अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वर जाहीर केला जाणार आहे .

Post a Comment

Previous Post Next Post