News Jobs

कोकण रेल्वेअंतर्गत विविध पदांची थेट मुलाखतीने भरती, असा करा अर्ज!

कोकण रेल्वे भरती 2021

Konkan Railway Recruitment 2021:
भारतीय रेल्वेमध्ये नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी चांगली संधी आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.भारतीय कोकण रेल्वे अंतर्गत विविध पदासाठी भरती होणार असून यासाठी उमेदवारांना थेट मुलाखतीसाठी बोलावण्यात येणार आहे. कोकण रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर या भरतीसंदर्भात नोटिफिकेश जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये होणाऱ्या भरती अंतर्गत जम्मू -काश्मीरमध्ये चालवल्या जाणाऱ्या USBRL प्रकल्पासाठी तांत्रिक सहाय्यकाची पदे भरली जाणार आहेत.

कोकण रेल्वेने यासंदर्भात नोटिफिकेशन जाहीर केले आहे. तांत्रिक सहाय्यक पदावर भरतीसाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही. या नोकरीशी संबंधित आवश्यक माहिती कोकण रेल्वेची अधिकृत वेबसाइट konkanrailway.com वर देण्यात आली आहे.

पदाचे नाव व वेतन

  • पदाचे नाव : वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (नागरी) 
  • वेतन : दरमहा ३५  
  • पदाचे नाव : कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक (नागरी) 
  • वेतन : दरमहा ३० हजार रुपये 

कोकण रेल्वेमध्ये भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता

वरिष्ठ आणि कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक नागरी – BE/B.Tech सिविल डिग्री. किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक पदासाठी कमाल वय ३द वर्षे असावे. तर कनिष्ठ तांत्रिक सहाय्यकासाठी कमाल वय २५ वर्षे आहे. दोन्ही पदांसाठी उमेदवारांचे वय १ सप्टेंबर २०२१ पासून मोजले जाईल.

वॉक इन इंटरव्ह्यू ( वेळापत्रक )

वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक - २० ते २२ सप्टेंबर सकाळी ९.३० ते दुपारी १.३० पर्यंत

कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक - ३ ते २५ सप्टेंबर सकाळी ९.३० ते दुपारी १.३० पर्यंत

पदभरतीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठीक्लिक करा

Post a Comment

Previous Post Next Post