News Jobs

पोलीस भरती अपडेट्स 2021 : लेखी परीक्षा 5 ऑक्टोबर होणार! जाणून घ्या या वर्षीच्या पोलीस भरतीचे वैशिष्ट्ये.

Police  Recruitment Update: An advertisement was issued in 2019 for the vacant post of Police Peon under the Pune Police Commissionerate. In this, 39 thousand 323 candidates have applied.  The recruitment process had been delayed for a year and a half.  The recruitment process has been accelerated due to the reduction in corona infection.  As per the decision taken by the state government, it has been decided to have a written test for the first time before the physical test in the police recruitment process.

पुणे पोलिस आयुक्तालय अंतर्गत रिक्त झालेल्या पोलिस शिपाई पदासाठी 2019 मध्ये जाहिरात देण्यात आली होती .यामध्ये 39 हजार 323 उमेदवारांनी अर्ज केले आहेत . दिड वर्षांपासून प्रलबीत भरती प्रक्रिया लांबणीवर पडली होती . कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने भरती प्रक्रियेला वेग देण्यात आला आहे . राज्य सरकारने घेतलेल्या निर्णया नुसार, पोलिस भरती प्रक्रियेमध्ये शारिरीक चाचणीच्या आगोदर पहिल्यांदाच लेखी परिक्षा ठेवण्याचा निर्णय घेतला आहे .

 याबरोबरच पोलिस महासंचालक कार्यालयाकडून पहिल्यांदाच प्रत्येक पोलिस घटकाला खासगी यंत्रणेमार्फत लेखी परिक्षा घेण्याच्या सुचना दिल्या होत्या.याबाबत पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता , अतिरिक्त पोलिस आयुक्त जालिंदर सुपेकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली . 

जाणून घ्या या वर्षीच्या पोलीस भरतीचे वैशिष्ट्ये!

  • पुणे पोलिस आयुक्तालयाची लेखी परिक्षा जी . एस . सॉफ्टवेअर या कंपनीमार्फत राबविली जाईल .
  • परीक्षेसाठीची सर्व व्यवस्था संबंधीत कंपनी पाहणार आहे . 
  • परिक्षेसाठी 22 सप्टेंबरपासून उमेदवारांच्या ईमेलवर आलेल्या लिंकवर प्रवेशपत्र मिळू शकेल . 
  • परिक्षेत कोणत्याही प्रकारे गैरप्रकार घडू नयेत , यासाठी सीसीटीव्ही , बायोमेट्रीक सुविधा , व्हिडीओ चित्रीकरणवर भर दिला आहे . 
  • हि परिक्षा शहराच्या वेगवेगळ्या भागातील 143 केंद्रावर होईल . त्यामध्ये कोरोनासंबंधीचे सर्व नियमांचे पालन होणार आहे .
  • प्रवेशपत्र मिळण्यास सुरूवात – 22 सप्टेंबर 
  • पोलिस भरती लेखी परीक्षा – 5 ऑक्टोबर 
  • परिक्षेची वेळ – सकाळी 11 ते 12.30 पोलिस भरतीची वैशिष्ट्ये 
  • उमेदवारांची संख्या -39 हजार 323 
  • परीक्षा केंद्रांची संख्या – 143 
  • परिक्षा केंद्रांवरील ब्लॉक -2198 
  • एका ब्लॉकमधील उमेदवार क्षमता- 24 
  • बैठक व्यवस्थेची प्रस्तावित तरतुद – 52 हजार 775
Police  Recruitment Update


Post a Comment

Previous Post Next Post