News Jobs

टपाल विभागात काम करण्याची संधी! ७ सप्टेंबरला थेट मुलाखती होणार. सविस्तर वाचा.

भारतीय टपाल विभाग भरती

नोकरीच्या शोधात असणाऱ्या बेरोजगार यांच्यासाठी भारतीय टपाल सेवा विभागात काम करण्याची सुवर्ण संधी कोरोना व लॉकडाउनमुळे नोकऱ्या गमावलल्या अनेकांना टपाल जीवन विमा , ग्रामीण टपाल जीवन विमा विभागात एजंट म्हणून काम करण्याची संधी मिळू शकते . शहर आणि जिल्ह्यात अशा विमा एजंटांची नियुक्ती करण्यात येणार असून , यासाठी येत्या 7 सप्टेंबर रोजी सकाळी दहा ते चार यावेळेत पुण्यात थेट मुलाखती घेण्यात येणार आहेत . 

पात्रता

टपाल विभागातील विमा एजंटसाठी १८ वर्षांपासून ५० वर्षापर्यंत कोणीही मुलाखत देऊ शकतात .

बेरोजगार ,स्वयंरोजगार व्यक्ती ,माजी जीवन विमा सल्लागार , कोणत्याही विमा कंपनीचे माजी अभिकर्ता , माजी सैनिक , अंगणवाडी कर्मचारी , महिला मंडळ निवृत्त शिक्षक , स्वयंसहायता समूह पदाधिकारी इत्यादी टपाल जीवन विमा अभिकर्ता यांना प्राधान्य देण्यात येणार आहे .

 टपाल विमा गांना नियुक्तीनंतर टपाल विभागाने निर्धारित केलेले कमिशन प्रोत्साहन भत्ता नियमितपणे देण्यात येणार आहे . या पत्त्यावर मुलाखतीला जावे गेल्या दीड दोन वर्षांत कोरोना आणि लॉकडाऊनमुळे मोठ्याप्रमाणात लोकांच्या नोक - या गेल्या आहेत . या अशा बेरोजगारीच्या परिस्थितीत टपाल विभागाकडून मोठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे . 

थेट मुलाखत पत्ता : 

यासाठी टपाल जीवन विमा , ग्रामीण टपाल जीवन विमा थेट मुलाखतीसाठी जंगली महाराज रस्ता येथील अधीक्षक डाकघर , पुणे ग्रामीण विभाग 

आवश्यक कागदपत्रे : 

 शैक्षणिक प्रमाणपत्र तसेच पॅन कार्ड , आधार कार्ड व अन्य संबंधित दस्तावेजसह येत्या ७ सप्टेंबर रोजी उपस्थित राहावे , असे आवाहन पुणे ग्रामीण विभागाचे अधीक्षक डाकघर यांनी केले आहे .



Post a Comment

Previous Post Next Post