Top News

अहमदनगर सैन्यभरती अपडेट ; सप्टेंबरमधील भरती लांबणीवर , जाणून घ्या नेमकं कारण ?

भरतीची नवीन तारीख नंतर जाहीर करण्यात येणार ! 

इंडियन आर्मी भरती मेळावा अ. नगर

Indian Army Recruitment Rally 2021 
:इंडियन आर्मीच्यावतीनं देशभर भरती प्रक्रिया राबवली जाते . या भरती प्रक्रियेचा भाग म्हणून अहमदगर येथे सैन्य भरती मेळावा होणार होता. ही भरती सोल्जर जनरल ड्युटी , नर्सिगं असिस्टंट आणि सोल्जर क्लार्क , सोल्जर ट्रेडसमन आणि सोल्जर टेक्निकल या पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार होती . मात्र हा भरती मेळावा रद्द करून पुढे ढकलण्यात आला आहे. 

भरतीची नवीन तारीख नंतर जाहीर करण्यात येणार.

युवक मोठ्या प्रमाणात सैन्यात भरती होऊन देशसेवा करण्याचं स्वप्न पाहत असतात . भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी विद्यार्थी आणि तरुण सातत्यानं प्रयत्न करत असतात . इंडियन आर्मीच्यावतीनं देशभर भरती प्रक्रिया राबवली जाते . या भरती प्रक्रियेचा भाग म्हणून अहमदगर येथे होणारी सैन्य भरती लांबणीवर टाकण्यात आली आहे . भरतीची नवीन तारीख नंतर जाहीर करण्यात येईल , असं इंडियन आर्मीच्या पुणे येथील जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे .

 भरती लांबणीवर का टाकण्यात आली ? इंडियन आर्मीच्या वतीनं अहमदनगरमधील महात्मा फुले कृषी विद्यापीठ , राहुरी येथे सैन्य भरतीचं आयोजन करण्यात आलं होतं . 7 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर दरम्यान सैन्य भरती घेण्यात येणार होती . कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती आणि कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आल्याची माहिती पुणे येथील लष्कराचे जनसंपर्क अधिकारी यांनी सांगितलं आहे .

Post a Comment

Previous Post Next Post