पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक / शिक्षक पदभरतीबाबत उमेदवारांसाठी स्वप्रमाणपत्र नव्याने नोंद करणे / पूर्वीच्या स्वप्रमाणपत्रामध्ये दुरुस्त्या करण्याबाबतच्या सूचना (दुसरा टप्पा) सुरु कारण्यात आला आहे. दुसऱ्या टप्प्यातील (TAIT-२०२२) शिक्षक पदभरती या अंतर्गत होणार आहे. या बाबत पुढील प्रमाणे सूचना देण्यात आल्या आहेत.
१) पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक शिक्षक पदभरतीबाबत उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्याबाबतच्या पवित्र पोर्टलवर यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या दिनांक १/०९/२०२३ च्या दोन सूचना तसेच ४/०९/२०२३, १४/०९/२०२३, १८/०९/२०२३, २१/०९/२०२३, २९/०९/२०२३, ०१/१०/२०२३ इत्यादी सूचनांचे अवलोकन करावे. सदर सूचना योग्य त्या फेरफारांसह दुसऱ्या टप्प्यातील (TAIT-२०२२) स्वप्रमाणपत्र नव्याने नोंद करणे / पूर्वीच्या स्वप्रमाणपत्रामध्ये दुरुस्त्या करण्यासाठी लागू राहतील.
हेही वाचा :
२) शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२ मधील प्राप्त गुणांच्या आधारे, शासन निर्णय ०७/०२/२०१९, १०/११/२०२२ व इतर आनुषंगिक शासन निर्णयांतील तरतुदींनुसार, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांतील शिक्षण सेवक / शिक्षक या रिक्त पदांवर टप्पा २ अंतर्गत भरती करण्यात येणार आहे.
३) शिक्षकांची सदर भरती ही त्या त्या व्यवस्थापनांमध्ये रिक्त असलेली पदे, इयत्तांचा गट, विषय, अध्यापनाचे माध्यम, आरक्षण (समांतर आरक्षणासह), उमेदवारांनी शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणीमध्ये प्राप्त केलेले गुण व त्यांनी पोर्टलवर लॉक केलेले प्राधान्यक्रम इत्यादी बाबी एकत्रित विचारात घेऊन गुणवत्तेनुसार पवित्र प्रणालीमार्फत शिफारस होणार आहे. इतर सर्व सूचना वाचन्यासाठी खालील pdf डाउनलोड करा.
पवित्र पोर्टल सूचना PDF : डाउनलोड करा
Post a Comment