News Jobs

जिल्हा परिषद आरोग्य विभागातील गट क साठी सरळसेवेची रिक्त पद भरती! असा करा अर्ज.

जिल्हा परिषद पद भरती
जिल्हा परिषद पद भरती

जिल्हा परिषद , नागपूर अंतर्गत आरोग्य विभागातील गट क मधील सरळसेवेची रिक्त पदे भरण्यासाठीची जाहिरात पदभरती सन २०२१ दिनांक २० ऑगस्ट २०२१ मधील सुचनेनुसार माहे मार्च २०१ ९  च्या जाहिरातीमध्ये नमूद मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर यांच्या अधिपत्याखाली आरोग्य विभागाशी संबंधित आस्थापनेवरील गट क संवर्गातील  पदांकरिता सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासप्रवर्गाचे ( एसईबीसी ) आरक्षण रद्द झाल्याने , एसईबीसी या प्रर्गाचे अराखीव जागेमध्ये रुपांतरीत झाले आहेत , त्यामुळे  अराखीव ( खुल्या ) प्रवर्गाचे समांतर आरक्षणामध्ये बदल करण्यात येत आहे . तसेच केंद्रशासनाच्या दिव्यांग हक्क अधिनियम , २०१६ नुसार दिव्यांगाच्या नवीन वाढीव प्रवर्गाचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे . 

त्यानुसार यापूर्वी माहे मार्च , २०१ ९ मध्ये प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमध्ये सर्वसाधारण ( खुला ) प्रवर्गातील वाढीव समांतर आरक्षण व नवीन प्रवर्गानुसार दिव्यांग  आरक्षणासाठी खालीलप्रमाणे रिक्त पदे भरण्यासाठी सरळसेवा भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा www.maharddzp.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे ,

जिल्हा परिषद पद भरती


१ ) नव्याने समाविष्ठ दिव्यांग प्रवागांचे आरक्षणामधील व नव्याने समाविष्ठ समांतर प्रवर्गाचे आरक्षणामधील पदासाठीच्या पदभरती करिता सविस्तर जाहिरात व जाहीर प्रगटन हे www.maharddzp.comwww.nagpurzp.com 

संकेतस्थळावर उपलब्ध आहे . या जाहिरातीद्वारे केवळ दिव्यांग अधिनियम २०१६ नुसार दिव्यागांच्या नव्याने समाविष्ठ प्रवर्गाकरिता तसेच सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग रद्द झाल्याने खुल्या प्रवर्गाअंतर्गत नव्याने वाढलेल्या समांतर आरक्षणाच्या प्रवर्गाकरिता नव्याने जाहिरात प्रसिद्ध करून अर्ज मागविण्यात येत आहेत .

२ ) यापूर्वी माहे मार्च २०१ ९ च्या जाहिरातीमधील दिव्यांगाच्या प्रवर्गाकरिता ( OL , BL ) ( एका पायाने / दोन्ही पायाने दिव्यांग ) साठी अर्ज केलेल्या उमेदवारांची नव्याने अर्ज मागविण्यात येणार नसल्याने या जाहीरातीमध्ये नमुद केलेल्या दिव्यांगाच्या नव्याने समाविष्ठ प्रवर्गाकरिताच , दिव्यांग उमेदवारांकडून नव्याने अर्ज मागविण्यात येत आहेत . 

३ ) या जाहिरातीद्वारे एका उमेदवारांना , एकाच जिल्हा परिषदेसाठी अर्ज सादर करता येईल . त्यानुसार उमेदवारांने एकाच जिल्हा परिषदेची निवड करून , नव्याने समाविष्ठ दिव्यांग प्रवर्गाचे आरक्षणामधील व नव्याने समाविष्ठ समांतर प्रवर्गाचे आरक्षणामधील पदासाठी अर्ज सादर करावा . 

४ ) माहे मार्च , २०१ ९ च्या जाहिरातीनुसार सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास ( एसईबीसी ) प्रवर्गातील जागा अराखीव प्रवर्गात रुपांतरीत केल्यानंतर सदर जागांकरिता वयोमर्यादा तसेच परीक्षा शुल्क खुल्या प्रवर्गानुसारच राहतील , त्यानुसार शुल्क भरण्याची दक्षता घेण्यात यावी . 

५ ) नव्याने समाविष्ठ झालेल्या दिव्यांगाच्या प्रवर्गातील उमेदवारांनी यापूर्वीच्या माहे मार्च , २०१ ९ च्या जाहिरातीनुसार खुल्या अथवा इतर प्रवर्गातून अर्ज केला असल्यास अशा उमेदवारांना सुधारित विकल्प देणे आवश्यक राहील , 

६) यापूर्वी माहे मार्च , २०१ ९ जाहिरातीमधील दिव्यांगाच्या प्रवर्गाकरिता प्रसिद्ध केलेले अस्थीव्यंग , कर्णबधीर , अल्पदृष्टी या दिव्यांगाच्या प्रवर्गासाठी आता अर्ज करता येणार नाही तसेच नव्याने समाविष्ठ झालेल्या मेंदुचा पक्षाघात / कुष्ठरोगमुक्त / शारीरिक वाढ खुंटणे / आम्ल हल्ला ग्रस्त / विशिष्ट शिक्षण अक्षमता / मानसीक आजार तसेच दिव्यांगासह बहीरेपणा व अंधत्वासह एकापेक्षा जास्त दिव्यांगत्व या दिव्यांग प्रवर्गासाठी पात्र दिव्यांग उमेदवारांना जाहिरातीमध्ये ऑनलाईन अर्ज करता येईल . 

अर्ज ऑनलाईन सादर करण्याचे वेळापत्रक

ऑनलाईन पद्धतीने अर्ज व परिक्षा शुल्क भरणेची सुरुवात ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक दिनांक ०१.० ९ .२०२१ रोजी पासून दिनांक २१,० ९ .२०२१ रोजी मध्यरात्री ११.५ ९ वाजेपर्यंत

 वरील पदांची माहिती , शैक्षणिक अर्हता व अनुभव , कमाल व किमान वयोमर्यादा , भरती प्रक्रिया शुल्क , ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मार्गदर्शक सूचना , परिक्षेचे स्वरुप , निवड पद्धत , सर्वसाधारण अटी व शर्ती इ . बाबत अधिक माहितीची सविस्तर जाहिरात www.maharddzp.comwww.nagpurzp.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे .

 www.maharddzp.com हे संकेतस्थळ दिनांक ०१.० ९ .२०२१ रोजी पासून ते दिनांक २१.० ९ .२०२१ रोजी मध्यरात्री ११.५ ९ वाजेपर्यंत कार्यरत राहील . 

अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी सविस्तर जाहिरातीत व जाहीर प्रकटनातील दिलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचून अर्ज सादर करावेत . भरती प्रक्रिया / परीक्षा स्थगित करणे किंवा रद्द करणे , अंशतः बदल करणे , पदाच्या एकूण व संवर्गनिहाय संख्येमध्ये वाढ किंवा घट करण्याचे अधिकार जिल्हा निवड समिती नागपूर यांना राहतील . त्याबाबत कोणताही दावा सांगता येणार नाही किंवा वाद उपस्थित करता येणार नाही . 

Post a Comment

Previous Post Next Post