MPSC Update 2021:The state government had decided to postpone all important examinations in the state for the last one and a half years due to the prevalence of corona. Therefore, MPSC exam was also canceled. Many of these results could not sit the test. However, due to this decision, all such students have received relief from the state government.
कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे राज्यातील सर्व महत्त्वाच्या परीक्षा गेल्या दीड वर्षांपासून स्थगित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्यामुळे MPSC ची परीक्षाही रद्द करण्यात आली होती. या परिणाम अनेकांना परीक्षेला बसता येणार नव्हते. मात्र या निर्णयामुळे अशा सर्व विद्यार्थ्यांना दिलासा राज्य सरकारकडून मिळाला आहे.
कोरोनामुळे दोन वर्ष MPSC च्या परीक्षा झाल्या नव्हत्या. त्यामुळे वयाची मर्यादा दोन वर्षांनी वाढवावी अशी मागणी होती. याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. त्यामुळे आता एक वर्ष मुदतवाढ देण्याला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. यामुळे ज्यांची वयोमर्यादा ओलांडली आहे अशा विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.
विद्यार्थ्यांना सुरळीतपणे MPSC ची परीक्षा देता यावी यासाठी हा निर्णय मंत्री मंडळा कडून घेण्यात आला आहे. MPSC परीक्षेला बसण्यासाठी विद्यार्थ्यांना आता एका वर्षाची मुदत वाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे MPSC परीक्षेसाठी मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांना परत हा मोठा दिलासा असणार आहे.
येत्या 19 नोव्हेंबर रोजी MPSC परीक्षेचा अर्ज भरण्याची शेवटची मुदत असणार आहे. मात्र हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना आता अभ्यासासाठी आणखीन वेळ मिळणार आहे.
Post a Comment