News Jobs

रिलायन्स जिओ ( Reliance Jio ) मध्ये मोठी भरती! असा करा ऑनलाइन अर्ज.

Jio Recruitment 2021 – भारतातील नामांकित असलेल्यांसाठी रिलायन्स जिओ ( Jio Bharti 2021 ) मध्ये काम करण्याची सुवर्णसंधी आहे. रिलायन्स जिओने नुकतीच मुंबईत भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे . त्यानुसार कंपनीत इंजिनीअर पदांची भरती केली जाणार आहे . आयटी प्रोफेशनल्स असलेल्या तरुणांना येथे काम करण्याची मोठी संधी मिळणार आहे . आयटी आणि टेलिकॉम विभागातील भरतीसाठी रिलायन्स जिओकडून अर्ज मागविण्यात येत आहेत

या पदासाठी लागणारी शैक्षणिक आर्हता , वयोमर्यादा , अनुभव , तपशील यांची सविस्तर माहिती कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे . आयटी आणि टेलिकॉम क्षेत्रात शिक्षण घेतलेल्या तरुणांना यासाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे . 

पदाचे नाव : ग्रॅज्युएट नेटवर्क इंजिनिअर्स ट्रेनी ( Graduate Engineer Trainee Network )

शैक्षणिक पात्रता :  ग्रॅज्युएट नेटवर्क इंजिनिअर्स ट्रेनी ( Graduate Engineer Trainee Network ) या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही शाखेतून B.E./ B.Tech पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे . तसेच उमेदवारांकडे Cisco CCNA या कोर्समध्ये सर्टिफिकेशन असणे महत्त्वाचे आहे .

पगार : उमेदवाराची शैक्षणिक आर्हता आणि अनुभव पाहून पगार ठरविण्यात येईल . 

कामाचे स्वरुप :  पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना रिलायन्स जिओ व्यवसायाचे नियोजन आणि नियामक संघांकडून आवश्यकता जाणून घेणे , संबंधित कामांचे प्लानिंग करणे , महिन्याचा प्लान तयार करण्याचे काम करावे लागेल . तसेच ग्राहकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी नेटवर्क प्लानिंग करणे तसेच ट्राफिक फ्री नेटवर्क ठेवणे अशी कामे देखील पाहावी लागणार आहेत . निवड झालेल्या उमेदवारांना क्रॉस - फंक्शनल टीम सदस्यांशी संपर्क ठेवणे आवश्यक आहे . तसेच दिलेली सर्व काम वेळेत पूर्ण करणे देखील गरजेचे आहे . 

Reliance jio Recruitment : असा करा अर्ज

अधिकृत वेबसाइट www.jio.com वर जा . 

  • होमपेजवरील करीअर सेक्शनमध्ये जा
  • नवीन पेज खुले होईल 
  •  Reliance Jio Trainee Jobs यावर क्लिक करा 
  • संबंधित जॉब निवडून अप्लायवर क्लिक करा

जिओ ग्रॅज्युएट इंजिनियर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी नोटिफिकेशनमधील सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा त्यानंतर अर्ज करा . अर्जामध्ये काही त्रुटी आढळल्यास अर्ज बाद करण्यात येईल . 

Post a Comment

Previous Post Next Post