News Jobs

HDFC Bank Bharti - HDFC बँकेत तब्बल 2 हजार 500 पदांसाठी भरती होणार.

HDFC BANK भरती 2021
HDFC Bank Recruitment 2021 : HDFC बँकेने नुकतीच एक मोठी घोषणा केली असून, त्यानुसार ग्रामीण भागात आपला विस्तार करण्यासाठी येत्या काही दिवसात एचडीएफसी दोन लाख गावांत आपली बँकिंग सुविधा सुरु करणार आहे. यासाठी  २ हजार ५०० लोकांची भरती येत्या काही दिवसात करण्यात येणार आहे.

यानुसार पुढील १८ ते २४ महिन्यांत शाखा नेटवर्क , व्यवसाय प्रतिनिधी , सीएससी ( कॉमन सर्व्हिस सेंटर ) , भागीदार , व्हर्चुअल रिलेशनशिप मॅनेजमेंट आणि डिजिटल आउटरीच प्लॅटफॉर्मद्वारे ग्रामीण भागातबँकेचे कार्यक्षेत्र वाढवण्याचा प्रयत्न आहे.

दरम्यान रविवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकांच्या सुलभतेबद्दल नाराजी व्यक्त केली आणि त्यांना त्यांची उपस्थिती आणखी वाढवण्यास सांगितले . त्यानंतर एचडीएफसीने हे पाऊल उचलण्याचा निर्णय जाहीर केला . एचडीएफसी बँकेचे ग्रुप हेड ( कमर्शियल अँड रूरल बँकिंग ) राहुल शुक्ला यांनी यासंदर्भात माहिती दिली .

भारतातील ग्रामीण आणि निमशहरी बाजारपेठांमध्ये बँकेटा विस्तार कमी आहे . भारतीय बँकिंग व्यवस्थेसाठी दीर्घकालीन वाढीच्या संधी याद्वारे निर्माण केल्या जातील ' असे ते म्हणाले . पुढे जाऊन देशातील प्रत्येक पिनकोडमध्ये सेवा उपलब्ध करणे हे बँकेचे उद्दीष्ट असल्याचेही बँके कडून जाहीर करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post