News Jobs

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा ( TET ) ऑनलाईन अर्ज भरणेकरीता मुदत वाढ !

टीईटी ऑनलाईन अर्ज मुदत वाढ
TET 2021

TET Updates
:  महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा ( MAHATET ) २०२१ परीक्षा परिषदेमार्फत दि .१० ऑक्टोबर २०२१ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हयांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात आलेली आहे . सदर परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीताची प्रक्रिया सुरु असून आवेदन भरण्यासाठी  दि .०३ / ०८ / २०२१ ते २५/०८/२०२१ या कालावधीत मुदत देण्यात आलेली होती . मात्र आवेदनपत्र भरणेकरीता दि .०५ सप्टेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ देणे बाबत आदेशित करण्यात आलेले आहे . 


सबब सर्व उमेदवारांना ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दि .०५ सप्टेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे . सदर परीक्षेकरीता ज्या उमेदवारांचे आवेदनपत्र प्रलंबित असेल / आवेदनपत्र भरले नसेल अशा उमेदवारांनी दि .०५ सप्टेंबर २०२१ पर्यंत सदर प्रक्रिया पूर्ण करावी .


शिक्षक पात्रता परीक्षेच्या ( टीईटी ) वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता ! 

शिक्षक पात्रता परीक्षेच्या ( टीईटी ) वेळापत्रकात बदल करण्यात येणार आहे . १० ऑक्टोबर रोजी ‘ युपीएससी’ची परीक्षा असल्याने या दिवशी ‘ टीईटी ‘ घेता येणार नाही . त्यामुळे ही परीक्षा आठवडाभर लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post