अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षांच्या नोंदणीसाठी विद्यार्थ्यांना पहिली आणि दुसरी मुदतवाढ राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने दिली आहे.बीबीए, बीसीए, बीबीएम, बीएमएस, एमबीए (इंटिग्रेटेड), एमसीए (इंटिग्रेटेड) या अभ्यासक्रमाच्या प्रवेश घेणाऱ्या इच्छुक उमेदवारांकरिता सामाईक प्रवेश परीक्षा अनिवार्य आहे. या अभ्यासक्रमाच्या ऑनलाइन अर्जाची नोंदणी दोन जानेवारीपासून सुरू आहे. नोंदणीला मुदतवाढ देण्यात आली असून १० फेब्रुवारीपर्यंत विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे. एलएलबी पाच वर्षाच्या अभ्यासक्रमाच्या सीईटी ऑनलाइन नोंदणीसाठी पहिली मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ४ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारीपर्यंत नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. बीपीएड सीईटीसाठी पहिली मुदतवाढ १५ फेब्रुवारी पर्यंत देण्यात आली आहे. एमबीएस, एमसीए, बीएचएमसीटी, बी डिझाईन, एम.एचएमसीटी या अभ्यासक्रमांना द्वितीय मुदतवाढ देण्यात आली आहे. १० फेब्रुवारीपर्यंत या अभ्यासक्रमांच्या सीईटीसाठी ऑनलाइन नोंदणी करू शकणार आहे.
ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र बंधनकारक
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत २०२५-२६ मध्ये राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी कॅप आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) संवर्गातील प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी दिलेल्या परिशिष्ट अ नमुन्यात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असणार आहे. अधिक माहितीसाठी संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन सीईटी सेलच्या आयुक्तांनी केले आहे.
Post a Comment