तांत्रिक संवर्गातील १४० पदे भरण्यास महापालिकेला परवानगी


नाशिक महापालिकेत तांत्रिक संवर्गातील १४० पदे भरण्याला शासनाने परवानगी दिली आहे. शासनाकडून ३५ टक्के आस्थापना खर्च मर्यादेची अट शिथिल करण्यात आली असून, सुधारित आकृतिबंधास मंजुरी मिळावी, यासाठी शासनाकडे मनपाने वेळोवेळी पाठपुरावा केला होता. सेवा प्रवेश नियमाद्वारे ही भरती केली जाणार असून भविष्यात आस्थापना खर्चा मर्यादेत ठेवण्याच्या अटीशर्तीवर ही परवानगी देण्यात आली. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे झालेल्या सिंहस्थ आढावा बैठकीत भरतीला परवानगी द्यावी, अशी मागणी आयुक्त मनीषा खत्री यांनी केली होती. 

महापालिकेच्या आस्थापनेवर ७०८२ पदे मंजूर आहेत. त्यांपैकी सुमारे तीन हजारांहून अधिक पदे दरमहा सेवानिवृत्ती, स्वेच्छानिवृत्तीमुळे आजमितीस रिक्त आहेत. अपुऱ्या मनुष्यबळामुळे नागरी सेवा पुरविताना महापालिकेला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. काही वर्षांपूर्वी १४ हजार पदांचा सुधारित आकृतिबंध शासनाकडे मान्यतेसाठी पाठविला होता.

या आहेत अटी-शर्ती

सरळ सेवेने पदे भरावी. आस्थापना खर्च मर्यादेत ठेवावा. उत्पन्नवाढीसाठी उपाययोजना राबवा. आयुक्तांनी अहवाल सादर करावा.

संवर्गाचे नाव

उप अभियंता स्थापत्य - ८, यांत्रिकी - ३, विद्युत-२, सह. अभियंता -१, सहा. विद्युत -३, कनिष्ठ अभियंता विद्युत - ७, सहा. अभियंता स्थापत्य - २१, कनिष्ठ अभियंता स्थापत्य ४६, सहायक अभियंता यांत्रिकी ४, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी - ९, कनिष्ठ अभियंता वाहतूक - ३, सहा. कनिष्ठ अभियंता स्थापत्य - २८, सहायक कनिष्ठ अभियंता - ४

0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post