News Jobs

Mhada Bharti – म्हाडा ५६५ भरती परीक्षा पुन्हा लांबणीवर! परिपत्रक जाहीर.

MHADA Recruitment 2022

MHADA Recruitment 2022 : 
MHADA Recruitment 2022 Examination has been postponed again and a circular in this regard has been issued today. The examination for the posts of Assistant, Senior Clerk, Junior Clerk, Typist in Cluster 6 of MHADA Authority was to be held on January 29 and 30 in six sessions. The revised examination schedule will be announced on MHADA's website soon, MHADA said.

म्हाडा भरती 2022 परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्यात आली असून आज त्या संदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. म्हाडा प्राधिकरणाच्या क्लस्टर 6 मधील सहाय्यक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, टंकलेखक या पदांसाठी 29 आणि 30 जानेवारी रोजी सहा सत्रांत परीक्षा होणार होती.  सुधारित परीक्षेचे वेळापत्रक लवकरच म्हाडाच्या वेबसाइटवर जाहीर करण्यात येणार असल्याचे म्हाडा कडून सांगण्यात आले आहे. 

एमपीएससी आणि म्हाडा प्राधिकरणाच्या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी!

दरम्यान  एमपीएससीमार्फत (MPSC) घेण्यात येणाऱ्या जानेवारी महिन्यातील तीन परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यात अनेक उमेदवारांना एमपीएससी आणि म्हाडा प्राधिकरणाच्या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी येत असल्याने अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे 29 आणि 30 जानेवारी 2022 रोजी घेण्यात येणारी नियोजित म्हाडा (Mhada Exam) सरळ सेवा भरती परीक्षा 2021-22 पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.



Post a Comment

Previous Post Next Post