- हेही वाचा : परिवहन खात्यात ४,३५० जागासाठी " नवीन पद भरती आकृतिबंधाला " मंजुरी!
- हेही वाचा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अ आणि ब वर्ग च्या १ हजार ५८४ पदासाठी भरती प्रक्रिया सुरु!
दरम्यान राज्यात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (Maharashtra Teacher Eligibility Test 2021) मध्ये पेपर फुटीच्या बातम्याने उमेदवारामध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र परीक्षा परिषदे कडून याबाबत पेपर फुटीच्या बातम्या निर्धार असल्याच्या सांगत, उमेदवारांनी निश्चिंत रहाण्याचे अहवान केले आहे. दोन वर्षांनंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये टीईटी परीक्षा घेण्यात आली. टीईटीच्या पेपर एकसाठी दोन लाख ५४ हजार ४२८, पेपर दोनसाठी दोन लाख १४ हजार २५० उमेदवारांनी नोंदणी केली होती. यातील साधारण ९० टक्के उमेदवारांची टीईटी परीक्षेला उपस्थिती होती.
आता परीक्षार्थीना टीईटीच्या प्रोव्हिजनल आन्सर की ची प्रतीक्षा आहे. प्रोव्हिजनल आन्सर की प्रसिद्ध झाल्या नंतर उमेदवारांना हरकती घेण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी दिला जाणार असून उमेदवारांच्या हरकती, आक्षेपांचा विचार करून अंतिम उत्तरतालिका आणि निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
Post a Comment