News Jobs

MPSC Updates 2021 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अ आणि ब वर्ग च्या १ हजार ५८४ पदासाठी भरती प्रक्रिया सुरु!

MPSC Updates 2021

राज्यात वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागामार्फत १ हजार ५८४ पदांची शासकीय नोकर भरती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अ आणि ब वर्ग पदासाठी सदरची भरती प्रक्रिया सुरु करण्यात आल्याची माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी  दिली.यानुसार राज्यात वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाअंतर्गत वर्ग १ ते वर्ग ४ या रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून याबाबतची आढावा बैठक मंगळवारी ३० नोव्हेंबर २०२१ रोजी घेण्यात आली होती . 

देशमुख म्हणाले की, राज्यात अजूनही कोविडचा धोका टळलेला नसून ओमीक्रोम सारखा व्हेरीयनटचा वाढता धोका पाहता शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालयांमध्ये सतत वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासत आहे. यासाठी राज्यातील वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत ही मोठी पदभरती आहे. आतापर्यंत या विभागामार्फत एकूण १ हजार ५८४ वर्ग अ आणि ब पदासाठीचे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठविण्यात आले आहे. यापैकी १ हजार २६९ पदे वैद्यकीय शिक्षण कक्षाची आहेत. या पदांपैकी बहुतांश पदासाठी आयोगामार्फत जाहिराती प्रसिध्द करण्यात आल्या असून भरतीची प्रक्रिया सुरु आहे.

भरती संदर्भात अधिक माहिती देताना  वै्दयकीय शिक्षण मंत्री देशमुख म्हणाले कि, वर्ग ३ आणि वर्ग ४ मधील रिक्त पदे सध्या ५० टक्क्यांपर्यंत भरण्याबाबतची मंजुरी मिळालेली आहे. तर वर्ग ४ मधील पदे वैद्यकीय शिक्षण विभागच्या अखत्यारित येणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठातांना कंत्राटी पध्दतीने भरण्याची परवानगी देण्यात आली आहे.

वर्ग-३ संदर्भात मंजूर पदापैकी ५० टक्के पदे भरण्याची परवानगी ! 

संबंधित वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांनी याबाबत कार्यवाही करुन ही पदे तातडीने भरावी. तसेच वर्ग-३ संदर्भात मंजूर पदापैकी ५० टक्के पदे भरण्याची परवानगी राज्य शासनाची असल्याने याबाबतची जाहिरात कालबध्द वेळेत प्रसिध्द करुन या भरती प्रक्रियेला गती देण्यात यावी.

वर्ग १ ते वर्ग ४ ची पदभरती वेळेत झाल्यास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येणार नाही. याशिवाय तदर्थ पदोन्नती, निम्न वेतनश्रेणीतील पदे उन्नत करण्यासाठी आवश्यकत त्या बाबी विभागीय निवड समितीसमोर मांडून वेळेत त्याबाबत निर्णय घेण्याला गती देण्यात यावी असेही वै्दयकीय शिक्षण मंत्री देशमुख यांनी यावेळी सांगितले.

सदर बैठकीला वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण आयुक्त वीरेंद्र सिंह, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सहसचिव शिवाजी पाटणकर, उपसचिव प्रकाश सुरवसे, अवर सचिव संतोष देशमुख, आयुषचे संचालक डॉ. कोहली यांच्यासह वैद्यकीय शिक्षण विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post