अग्निवीर भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या भरतीची संपूर्ण माहिती

अग्निवीर भरती 2025

Online applications are invited from unmarried male candidates for the selection test for fire warriors to be recruited for the year 2025-26 under the Agneepath scheme. 

अग्निपथ योजनेअंतर्गत २०२५-२६ या वर्षासाठी भरती होणाऱ्या अग्निवीरांसाठी निवड चाचणीसाठी अविवाहित पुरुष उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत 

ऑनलाइन नोंदणी तारखा: १२ मार्च २०२५ ते १० एप्रिल २०२५ (तारखांमध्ये कोणताही बदल www.joinindianarmy.nic.in वेब पोर्टलवर टिकरद्वारे सूचित केला जाईल) 

ऑनलाइन परीक्षेच्या तारखा: जून २०२५ पुढे (तात्पुरते) (ऑनलाइन परीक्षेच्या अंतिम तारखा नंतर जाहीर केल्या जातील.


पदाचे नाव : 

  • अग्निवीर जनरल ड्युटी (GD)
  • अग्निवीर टेक्निकल  
  • अग्निवीर क्लर्क / स्टोअर कीपर टेक्निकल   
  • अग्निवीर ट्रेडसमॅन (8वी व 10वी पास)   
  • अग्निवीर सैनिक फार्मा  
  • अग्निवीर सैनिक टेक्निकल नर्सिंग असिस्टंट   
  • महिला लष्करी पोलीस 
  • हवालदार एज्युकेशन व सर्वेयर ऑटोमेटेड कार्टोग्राफर 
  • JCO कॅटरिंग व JCO रिलिजियस टीचर  

यंदा उमेदवारांना एका अर्जामध्ये दोन पदांसाठी अर्ज करण्याची संधी आहे. यामुळे निवड होण्याची शक्यता अधिक वाढेल!  

अर्ज शुल्क फक्त ₹250 असून, ते ऑनलाइन जमा करावे लागेल

अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक असतील 

  • 10वी किंवा 12वी गुणपत्रिका  
  • मूळ रहिवासी प्रमाणपत्र (डोमिसाइल) 
  • ओळखपत्र (आधार / पॅन कार्ड / ड्रायव्हिंग लायसन्स)
  • फोटो आणि स्वाक्षरी स्कॅन करून अपलोड करावी लागेल

 धावण्याच्या नियमांमध्ये बदल – अधिक संधी!

यंदा धावण्याचे  चार गट करण्यात आले आहेत, त्यामुळे जास्त उमेदवारांना संधी मिळेल!  

  • 5 मिनिटे 30 सेकंदात धावणे पूर्ण केल्यास – 60 गुण
  • 5 मिनिटे 31 सेकंद ते 5 मिनिटे 45 सेकंद – 48 गुण  
  • 5 मिनिटे 46 सेकंद ते 6 मिनिटे – 36 गुण
  • 6 मिनिटे 1 सेकंद ते 6 मिनिटे 15 सेकंद – 24 गुण


शारीरिक पात्रता आणि उंची निकष

अग्निवीर GD, टेक्निकल, ट्रेडसमॅन (8वी व 10वी पास) साठी 

उंची – 170 सेमी

 छाती – 77 सेमी (82 सेमी फुगवून)

अग्निवीर क्लर्क, स्टोअर कीपर टेक्निकल साठी 

उंची – 162 सेमी 

छाती – 77 सेमी (82 सेमी फुगवून) 

महिला लष्करी पोलीससाठी 

उंची – 157 सेमी


शैक्षणिक पात्रता – पात्र ठरण्यासाठी आवश्यक गुण

अग्निवीर GD:  

10वी उत्तीर्ण, किमान 45% गुण आणि प्रत्येक विषयात 33% गुण आवश्यक.

अग्निवीर टेक्निकल:

12वी उत्तीर्ण, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि इंग्रजीमध्ये 50% गुण आणि प्रत्येक विषयात किमान 40% गुण आवश्यक.

अग्निवीर क्लर्क / स्टोअर कीपर टेक्निकल:

12वी उत्तीर्ण, एकूण 60% गुण, इंग्रजी आणि गणित/अकाउंट्समध्ये 50% गुण आवश्यक.


  • अग्निवीर ट्रेडसमॅन (10वी पास):  
  • सर्व विषयांमध्ये किमान 33% गुण आवश्यक
  • अग्निवीर ट्रेडसमॅन (8वी पास):
  • सर्व विषयांमध्ये किमान 33% गुण आवश्यक.  
  • महिला लष्करी पोलीस:
  • 10वी उत्तीर्ण, 45% गुण आणि प्रत्येक विषयात 33% गुण आवश्यक. 

लेखी परीक्षा – 

अग्निवीर भरतीसाठी लेखी परीक्षा जून 2025 मध्ये होण्याची शक्यता आहे. 

परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक http://www.joinindianarmy.nic.in वर लवकरच प्रकाशित होणार आहे.  

0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post