This is important news for those who want to get a bank job. Suvarnaratna Multistate Bank has started recruitment for 16 vacancies for various posts. For this, applications have also been started from eligible candidates. Applications are invited from 30th, last date for application is 5th February 2025.
बँकेत नोकरी मिळवण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. सुवर्णरत्न मल्टिस्टेट बँकेत विविध पदांसाठी 16 जागांची भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यास सुरुवात देखील झाली आहे. 30 तारखेपासून अर्ज मागवण्यात येत असून , अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 फेब्रुवारी 2025 आहे.
संस्थेच्या शाखा;-
सुवर्णरत्न मल्टिस्टेट को-ऑफ क्रेडिट सोसायटी बँकेची मुख्य शाखा सिद्धापूर येथे असून बोराळे, नंदूर, मंगळवेढा, अनवली, बेगमपूर, कुरुल, सोलापूर येथील शाखेसाठी विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. मुलाखत ठिकाणी इच्छूक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर शुक्रवारी दि.7 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता बायोडाटासह हजर राहावे.
हेही वाचाच -
- सरळसेवा भरती 2025 : महाराष्ट्र शासन च्या वित्त विभाग अंतर्गत रिक्त पदासाठी मोठी भरती जाहीर, येथे अर्ज करा. |
- Indian Army SSC Tech Recruitment 2025– Indian भारतीय सैन्यात एसएससी टेक भरती २०२५ |
पद, पदसंख्या व पात्रता / अनुभव
शाखा व्यवस्थापक ( सोलापूर शाखेसाठी)
पद संख्या : 1
उत्तम संवाद कौशल्ये आणि संगणक ज्ञान आवश्यक
शैक्षणिक पात्रता : (बी. कॉम/ एम.कॉम/बीबीए/एमबीए शैक्षणिक पात्रता असावी)
अनुभव : बँकिंग क्षेत्रात किमान 3 ते 5 वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.
लोन ऑफिसर ( वरील सर्व शाखेकरिता)
पद संख्या : 15
उत्तम संवाद कौशल्ये आणि संगणक ज्ञान आवश्यक, किमान पदवीधर शैक्षणिक पात्रता असावी.
फ्रेशर देखील अर्ज करू शकतात, बँकिंग क्षेत्रात किमान 3 ते 5 वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य असेल.
पगार आणि सुविधा
निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी देण्यात येणार आहे तर इन्सेटीव्ह आणि प्रमोशनची संधी देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच उत्कृष्ट कार्य संस्कृती आदी सुविधा मिळणार आहेत.
येथे करा अर्ज
इच्छुक उमेदवारांनी suvarnratnamscs@gmail.com या मेल वरती बायोडाटा पाठवावा.
मुलाखती दिनांक : 7 फेब्रुवारी रोजी
अर्ज करण्यासाठी 5 फेब्रुवारी ही शेवटची संधी असून 7 फेब्रुवारी रोजी मुलाखती घेतल्या जाणार आहेत.
मुलाखत ठिकाण
पत्ता : श्री मल्लिकार्जुन अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी, मंगळवेढा, धर्मगाव रोड, पंढरपूर-सोलापूर बायपास जवळ, दामाजीनगर मंगळवेढा.
अधिक माहितीसाठी ‘या’ नंबरवर संपर्क साधावा
सुवर्णरत्न मल्टीस्टेट बँकेत नोकरी संदर्भात अधिक माहितीसाठी 7768947903 / 9975312379 किंवा 9011926698 या नंबर वरती संपर्क साधू शकता.
Post a Comment