लाडकी बहीण योजना हफ्ता बाबत नवीन अपडेट समोर आली आहे. राज्यातील सर्व लाडक्या बहिणींला दिलासा मिळणार आहे. जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा झाल्यानंतर अनेक महिलांनी नाराजी व्यक्त केली. सरकारने फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे दोन्ही हफ्ते मिळतील असे सांगितले होते, मात्र प्रत्यक्षात फक्त १५०० रुपये जमा झाले, अशी तक्रार महिलांनी केली.
दरम्यान फेब्रुवारी महिन्याचा हफ्ता ७ मार्च रोजी महिलांच्या खात्यात पैसे जमा झाला मात्र अपेक्षित ३,००० ऐवजी फक्त १,५०० रुपयेच मिळाले. त्यामुळे महिलांमध्ये नाराजी पसरली. सरकारने दोन महिन्यांचे पैसे एकत्र देतील असे सांगितले होते, पण प्रत्यक्षात फक्त एका महिन्याचा हफ्ता मिळाला. महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण देत सांगितले की, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे दोन टप्प्यांत दिले जाणार असून, पहिल्या टप्प्यात फक्त फेब्रुवारी महिन्याचे १,५०० रुपये जमा करण्यात आले असून, उर्वरित हफ्ता लवकरच दिला जाईल. ७ मार्चपासून सुरू झालेली ही प्रक्रिया १२ मार्चपर्यंत पूर्ण होईल, आणि सर्व पात्र महिलांच्या खात्यात एकूण ३,००० रुपये जमा होतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
Post a Comment