“भूमी अभिलेख” , परंतु या भूमी अभिलेख विभागात अधिकारी, कर्मचाऱ्यांची तब्बल २५२८ पदे रिक्त आहेत. यात सर्वाधिक १२४७ शिपायांची पदे भरली गेलेली नाही. उपजिल्हाधिकारी तथा समन्वयक ई- फेरफार हे केवळ एक पद मंजूर आहे. तेही रिक्त ठेवण्यात आले आहे. जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेखची १३ पदे रिक्त आहेत. मंजूर ४३ पैकी ३० जागा भरल्या आहेत. लेखा अधिकाऱ्याचे मंजूर असलेले एकमेव पदही भरण्यात आलेले नाही. या विभागाती अडीच हजार पेक्षा जास्त रिक्त पदे येत्या नवीन वर्षात सरकार तर्फे भरती अपेक्षित आहे. येत्या २०२५ मध्ये या विभाग पदभरती होईल अशी अपेक्षा आहे.
मंजूर पदे व रिक्त संख्या
उपअधीक्षक भूमी अभिलेख, नगर भूमापन अधिकारी, विशेष उपअधीक्षक भूमी अभिलेख तथा चौकशी अधिकारी, विशेष उपअधीक्षक भूमी अभिलेख तथा चौकशी अधिकारी (शहर मापन), विशेष उपअधीक्षक भूमी अभिलेख (गावठाण), कार्यालय अधीक्षक ही ४३१ पैकी तब्बल २० पदे रिक्त आहेत. सहायक लेखाधिकाऱ्यांची दोन पैकी केवळ एक जागा भरण्यात आली. उच्चश्रेणी लघुलेखक दोनपैकी एकच आहे. निम्नश्रेणी लघुलेखकांच्या नऊ पैकी चार जागा रिक्त आहेत. वाहन चालकांची ४८ पदे मंजूर आहेत. त्यातील केवळ १६ कार्यरत आहेत. वरिष्ठ लिपिक ३५, परीक्षक भूमापक-निमतानदार ८१, कनिष्ठ लिपिक ९०८, नाईक ११४ आणि शिपायांची १२४७ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे भूमी अभिलेख विभागात कामे वेळेत निकाली निघत नाही. परिणामी कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते.
Post a Comment